खुर्शिदांची भाषा योग्य नाही – राहुल गांधी

February 27, 2014 12:54 PM6 commentsViews: 1120
rahul gandhi delhi pc3127 फेब्रुवारी :  भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबाबत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी केलेले वक्तव्य योग्य नाही, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
गुजरातमध्ये झालेल्या दंगली रोखण्यात अपयशी ठरलेले मोदी हे ‘नपुंसक’ आहेत, अशी जळजळीत टीका सलमान खुर्शीद यांनी केली होती. उत्तरप्रदेशातील फारूखाबादमध्ये झालेल्या सभेत खुर्शीद यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतरही खुर्शिद यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले होते.

देशातील जनतेच्या दाव्यानुसार देशाचा पंतप्रधान हा बळकट आणि शक्तिशाली असावा, पण गोध्रामधील नागरिकांची तुम्ही सुरक्षा करू शकत नाही. काही जण येतात, हल्ला करून जातात आणि तुम्ही काहीच करत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणत्या अर्थाने शक्तिशाली म्हणायचे? जातीय दंगलीतील मृत्युमुखी पडलेल्यांना तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही ‘नपुंसक’ आहात, असे त्यांनी म्हटले होते.

खुर्शिद यांच्या वक्तव्याविषयी नाराजी वक्त करत राहुल गांधी म्हणाले, खुर्शिद यांनी वापरलेली अशा पद्धतीची भाषा योग्य नाही. त्यांचे हे वक्तव मला पटलेले नाही.
 • Sachin Nalawade

  Rahul …kana kahli de Khurshicha! Congess dubalai nighala ahey to

 • aazaad hindustaani

  मोदींना२७२+आकडा गाठता आला नाही तर ते जनतेने निवडून दिले नाही असे म्हणून बारा पक्षांची जुगाडभानगड न करता विरोधी पक्षात बसतील का घोडाबाजार भरवतील?आलेल्या साऱ्या सर्व्हेनुसार अजून भाजप व त्यांच्याबरोबर असलेले दोनअडीच पक्ष २२०च्यावर जाणारा नाहीत असेच सांगत आहेत.स्वत: नमो,नमोदास आणि भाजप “बाजारात तुरी अन भट भटणीला मारी”या उक्तीनुसार आधीच बाशिंग बांधून तयार झालेत.भारतीय लोकशाहीत नेहमीच निवडून आलेल्या पक्षाला लोक सरकारमध्ये स्वीकारतात.त्यामुळे जर भाजप निवडून आले तर लोक त्याला विरोध करतील असे नाही.पण लोकशाहीत सर्वच पक्षाचे लोक त्याच देशातील घटनेनुसार निवडणूक लढवतात.त्यामुळे जो ‘व्होट फॉर इंडिया’चा गुजराती ढोल नामोदास वाजवत आहेत तो सपशेल बिनबुडाचा आहे.कारण लोकांनी कोणत्याही अमुक पक्षाला मत दिले तरी ते मत ‘व्होट फॉर इंडिया’च असते.बेमालूनपणे भाजपला मत म्हणजे इंडिया’ला मत असा चकवणारा प्रचार करत आहेत.जे भाजपला मत देणार नाहीत ते भारताचे शत्रू असा प्रचार यातून सुरु आहे.नमोगजर करताना जरा विचारांची प्रगल्भता दाखवा नमोदास ……

 • aazaad hindustaani

  पूज्यनीय गोळवलकर यांनी आपल्या पुस्तकात असे म्हटले आहे कि या देशाचे ३ शत्रू आहेत १. कमुनिस्थ २ मुस्लिम ३. ख्रिश्चन आणि राज्यघटना हि जुनी गोधडी आहे ती फेकून द्यायला हवी या मताशी नरेंद मोदि सहमत नाही असे जाहीर करावे .

 • aazaad hindustaani

  पूज्यनीय गोळवलकर यांनी आपल्या पुस्तकात असे म्हटले आहे कि या देशाचे ३ शत्रू आहेत १. कमुनिस्थ २ मुस्लिम ३. ख्रिश्चन आणि राज्यघटना हि जुनी गोधडी आहे ती फेकून द्यायला हवी या मताशी नरेंद मोदि सहमत नाही असे जाहीर करावे …

 • aazaad hindustaani

  केजरीवाल सारखा नि पक्षपाती आणि जनसेवेने झपाटलेला माणूस आपण आजवर पाहिलेला नाही.त्याचा हा खटाटोप केवळ भ्रष्ट्राचार नाहीसा करण्यासाठी आहे.आपला त्यांना पूर्ण पाठींबा असून अशा माणसास शतश शुभेच्या.जन लोकपाल आलेच पाहिजे भ्रष्टाचार नाहीसा झालाच पाहिजे.`

 • mohit

  Kejariwal Ha publicity stunt aahe, swatachya swartha sathi delhi chi satta ghetali aani 45-50 divasatt rajinama hi dila n deshachi satta ha kahi por khel nahi so kejariwal la sanga aadhi swatach ghar chalaw n nantar desh chalwayala ye…..

close