राष्ट्रवादीची पहिली यादी,भुजबळ रिंगणात तर माढातून मोहिते पाटील

February 27, 2014 4:45 PM0 commentsViews: 5615

27 फेब्रुवारी :74745bhujbal and mohite लोकसभा निवडणुकीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने बिगुल फुंकले आहे. काँग्रेससोबत 22/26 फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 22 पैकी 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना रिंगणात उतरवण्यात आलंय. भुजबळ यांना आपल्याच बालेकिल्ल्यातून अर्थात नाशिकमधून उमेदवारी देण्यात आलीय.

तर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला माढाचा तिढा अखेर सुटला आहे. माढातून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून मोहिते पाटलांना उमेदवारी देण्यात आलीय. तर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आलीय.

भंडार्‍यातून प्रफुल्ल पटेल यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलीय. उस्मानाबादमधून पद्मसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली तर अमरावतीत अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्ती नवनीत राणा यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. तर सातार्‍यात पक्षालाच आव्हान देणारे उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. तर बीड, हिंगोली, मावळ आणि हातकणंगलेच्या उमेदवारीचा तिढा कायम असून यावर चर्चा सुरू आहे

राष्ट्रवादीच्या 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

1) नाशिक – छगन भुजबळ
2) माढा – विजयसिंह मोहिते पाटील
3) बारामती – सुप्रिया सुळे
4) उस्मानाबाद- पद्मसिंह पाटील
5) अमरावती- नवनीत राणा
6) ठाणे – संजीव नाईक
7) मुंबई नॉर्थ ईस्ट – संजय दिना पाटील
8) शिरुर – देवदत्त निकम
9) बुलडाणा- कृष्णराव इंगळे
10) सातारा- उदयनराजे भोसले
11) दिंडोरी- भारती पवार
12) भंडारा- प्रफुल्ल पटेल
13) अहमदनगर- राजीव राजळे
14) परभणी- विजय भांबळे
15) कल्याण- आनंद परांजपे
16) रावेर – मनिष जैन
17) कोल्हापूर – धनंजय महाडिक
18) जळगाव – सतीश पाटील

close