‘आप’ची 2 यादी जाहीर, नंदू माधव मुंडेंच्या विरोधात मैदानात

February 27, 2014 4:42 PM1 commentViews: 3358

nandu madhav27 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने आपल्या 29 उमेदवारांची दुसरी यादी आज (गुरूवारी) जाहीर केली आहे. देशभरातील उमेदवारांचा समावेश असलेली ही दुसरी यादी आहे. यात महात्मा गांधी यांचे नातू राजमोहन गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे निश्चित झालंय. राजमोहन गांधींना पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आलीय.

तर महाराष्ट्रात भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बालकिल्ल्यात अभिनेते नंदू माधव यांना उमेदवारी देण्यात आलीय. नंदू माधव आता मुंडेंना आव्हान देणार आहे. तर मावळमधून मारूती भापकर, चंद्रपूरमधून वामनराव चटप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

जालन्यातून दिलीप म्हस्के, सोलापूरमधून ललित बाबर, औरंगाबादमधून सुभाष लोमटे, अमरावतीमधून भावना वासनिक, सांगलीतून समिना खान ठाण्यातून संजीव साने आणि गोंदियामधून प्रशांत मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आलीय.

या आधी ‘आप’ने आपली पहिली यादी जाहीर केली होती. त्यात अंजली दमानिया नागपूरमधून भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. तर पत्रकार आशुतोष हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कपिल सिब्बल यांना आव्हान देणार आहेत. तर अमेठीमधून राहुल गांधी यांच्या विरोधात कुमार विश्वास निवडणूक लढवणार आहेत. तर ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांच्या विरोधात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर निवडणून लढवणार आहेत.

अशी आहे आम आदमी पार्टीची दुसरी यादी

महाराष्ट्रातील यादी

 • नंदू माधव- बीड
 • वामनराव चटप – चंद्रपूर
 • सुभाष लोमटे – औरंगाबाद    
 • मारुती भापकर- मावळ    
 • दिलीप मस्के – जालना
 • ललित बाबर -सोलापूर
 • समिना खान- सांगली
 • भावना वासनिक – अमरावती
 • संजीव साने- ठाणे
 • प्रशांत मिश्रा- गोंदिया

देशभरातील सदस्यांची यादी

 • राजमोहन गांधी – पूर्व दिल्ली
 • नवीन जयहिंद – रोहतक
 • व्ही. एस. राजपूत – विदिशा
 • शेखरभाई – जुनागढ
 • अनिता हिदोलिया – उज्जैन
 • अशोक जैन – कोटा
 • बलविंदर कौर – कुरुक्षेत्र
 • जगदीश सिंह – हिस्सार
 • राजन सुशांत – कांग्रा

 • aazaad hindustaani

  BJP vs AAP new joiners

close