भारताने चौथ्या वन डेबरोबर सीरिजही जिंकली

March 11, 2009 9:04 AM0 commentsViews: 10

11 मार्च हॅमिल्टनहॅमिल्टन वन डे जिंकत भारतीय टीमनं इतिहास रचला. न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच भारतानं वन डे सीरिजमध्ये विजय मिळवला. न्यूझीलंडविरुध्दच्या चौथ्या वन डे भारतानं तब्बल दहा विकेटनं न्यूझीलंडवर मात केली आणि पाच वन डे मॅचची ही सीरिज 3-0 अशी जिंकली. विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरच्या तुफान फटकेबाजी करत हॅमिल्टनवर रन्सची उधळण केली. हॅमिल्टन वन डेमध्ये विरेंद्र सेहवागने दणदणीत सेंच्युरी ठोकली. 60 बॉल्समध्ये सेंच्युरी पूर्ण करताना सेहवागने 14 फोर आणि 6 सिक्सची आतषबाजी करत 125 रन्स केले. भारतीय इनिंग दरम्यान आलेल्या दुस-या व्यत्ययानंतर भारतीय टीमचं लक्ष्य 43 ओव्हर्समध्ये 263 रन्स असं करण्यात आलं. पण सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी भारतीय इनिंगची सुुरुवात दिमाखात केली. एका बाजूला सेहवाग फटकेबाजी करत असताना दुस-या बाजूला गंभीरनेही त्याला तोलामोलाची साथ देत हाफ सेंच्युरी पूर्ण करत 63 रन्स केले. ओव्हरमागे आठ पेक्षा जास्त रन्सच्या सरासरीने रन्स काढत दोघांनी दोनशे रन्सची विनिंग पार्टनरशिप केली.त्यापूर्वी न्यूझीलंडच्या टीमने 47 ओव्हर्समध्ये 270 रन्स केले. त्यात ब्रँडन मॅक्युलम 77, मॅकग्लॅशनच्या 56 आणि ओपनर जेरी रायडरनेही 46 रन्स केले. मॅन ऑफ द मॅच विरेंद्र सेहवागला देण्यात आलं.

close