तात्याराव लहानेंची अटक टळली, अटकपूर्व जामीन मंजूर

February 27, 2014 3:12 PM0 commentsViews: 517

j j _tatyara lahane27 फेब्रुवारी : जे.जे.हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांचा अटकपूर्व जामीन मुंबई सेशन कोर्टाने मंजूर केलाय. यामुळे लहाने यांची अटक टळली आहे.

तात्याराव लहाने यांच्यावर जे जे हॉस्पिटलमधील एका चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍याला जातीवाचक शिवागाळ केल्याच्या आरोपाखाली जे जे मार्ग पोलीस स्टेशनमध्ये ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी डॉ. लहाने यांनी मुंबई सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर कोर्टाने हा आदेश दिलाय.

दोनच दिवसांपूर्वी त्यांना जेजेमध्ये पेशंट्स तपासण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आजपासून डॉ. लहाने सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये रुग्ण तपासणार आहेत. गेल्या दहा दिवसात डॉ लहानेंच्या तब्बल 900 शस्त्रक्रिया रद्द झाल्या होत्या. ऍट्रोसिटी प्रकरणात लहानेंना 25 फेब्रुवारी पर्यंत जे जे हॉस्पिटलमध्ये जायला मज्जाव केला होता. आता कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र डॉ. लहाने यांना मिळालेल्या अटकपूर्व जामीन रद्द व्हावा यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ हायकोर्टात जाणार आहे.

close