सुब्रतो रॉय यांना अटक होण्याची शक्यता

February 27, 2014 6:56 PM0 commentsViews: 439

subroto roy27 फेब्रुवारी : सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना अटक होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी रुपये थकवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात खटला सुरू आहे.

पण, आईची तब्येत बरी नसल्यामुळे आपल्याला कोर्टात हजर रहाण्यापासून सूट द्यावी, अशी याचिका कालच सुब्रतो रॉय यांनी कोर्टात केली होती. पण, कोर्टाने ही याचिका फेटाळली होती.

सुनावणीसाठी ते कोर्टात हजर न राहिल्यानं बुधवारी सुप्रीम कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. सुब्रतो रॉय उत्तर प्रदेशात असतील तर त्यांना जरूर अटक करू, असं यूपी पोलिसांनी सांगितलंय.

close