अलिबागमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, 5 ठार

February 27, 2014 7:32 PM0 commentsViews: 587

567alibag factory27 फेब्रुवारी : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात भायमळा येथे क्रांती फायर वर्क्स या फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागलीय. या दुर्घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले असून 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. यापैकी दहा जणांना जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आलंय. तर 10 गंभीर जखमींनी मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

अलिबागपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या भायमळा येथे हा क्रांती फायर वर्क्स फटाक्यांचा कारखाना आहे. 20 वर्ष जुना हा कारखाना आहे. आज (गुरुवारी) दुपारी 3.30 च्या सुमारास अचानक कारखान्यात फट्याकांचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कारखान्याला भीषण आग लागली.

या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, कारखाना जमीनदोस्त झालाय. कारखान्याची भिंत कोसळल्यामुळे ढिगाराखाली कामगार अडकले गेले यात 5  जणांचा मृत्यू झाला आहे. थऱ 20 जण जखमी झाले आहे. ढिगाराखाली आणखी कामगार अडकण्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी स्थानिक डॉक्टरांचे पथक हजर आहे. बचावकार्य सुरू असून उद्या या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे.

close