मोठे चौक आणि शाळेच्या मैदानांवर प्रचार सभांना बंदी

March 11, 2009 9:09 AM0 commentsViews: 9

11 मार्च मोठे चौक आणि शाळांच्या मैदानांवर प्रचाराच्या सभा घ्यायला निवडणूक आयोगानं बंदी घातलीये. त्याबाबत पोलिसांनी आदेशही दिले गेलेत. तर दुसरीकडं शैक्षणिक संस्थांची मैदान राजकीय सभा घेण्यासाठी वापरू नये असा फतवा निवडणूक आयोगानं काढलाय. पुण्यातील शनिवारवाडा, अलका टॉकीज चौक, सारसबाग चौक या सारख्या चौकांमध्ये सभा गाजली. म्हणजे पुण्यातील निवडणूक जिंकली असं समीकरण राजकीय पक्षांमध्ये होतं. पण या आदेशामुळं ते दिवस आता इतिहासजमा होणारेत. वाहतुक कोंडी आणि शहरातील कायदा सुव्यवस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं पोलिसांच म्हणणं आहे. चौक आणि शाळांची मैदानंही वापरायची नाहीत तर राजकीय सभा घ्यायच्या कुठं असा प्रश्न राजकीय पक्षांना पडलाय. "या बंदीविरोधात भाजप कोर्टात जाणार आहे, असं भाजपचे नेते गिरीश बापट यांनी सांगितलंय.

close