नवनीत राणांची उमेदवारी वादात

February 27, 2014 9:08 PM0 commentsViews: 8894

27 फेब्रुवारी : अमरावती लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत कौर-राणा यांना उमेदवारी जाहीर केलीय. पण उमेदवारी जरी जाहीर झाली असली तरी ती आता वादात सापडली आहे. अमरावती हा राखीव मतदार संघ आहे. नवनीत राणा या लवाणा गाढा या ओबीसी समाजातल्या आहेत. पण त्यांनी चांभार समाजाचं जात प्रमाणपत्र मिळवलंय. यासाठी जोडलेली सर्व कागदपत्र बनावट असल्याचं समोर आलंय. पोलीस दक्षता विभागाने त्यावर शिक्कामोर्तब केलाय. जात पडताळणी समितीने यासंदर्भातला अंतिम निर्णय 12 मार्च रोजी ठेवलाय. त्यामुळे हे प्रमाणपत्र बनावट असल्याचा अहवाल आला तर नवनीत राणा यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

close