भाजपची पहिली यादी जाहीर ; गडकरी, मुंडे रिंगणात

February 27, 2014 10:20 PM0 commentsViews: 8734

Image img_158532_gadkarimunde45_240x180.jpg27 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरलेल्या भाजपनंही आपली 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आपला गड कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. गडकरींना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर गडकरींच्या पाठोपाठ गोपीनाथ मुंडेंही आपल्या होम ग्राऊंडवर निवडणूक लढवणार आहे. बीडमधून गोपीनाथ मुंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे.

तर अहमदनगरमधून दिलीप गांधी, जालन्यातून रावसाहेब दानवे, जळगावमधून एटी नाना पाटील, रावेरमधून हरिभाऊ जावळे आणि चंद्रपूरमधून हंसराज अहिर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ईशान्य मुंबईत किरीट सोमय्या आणि उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी निवडणूक लढवणार आहे.अलीकडेच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले संजयकाका पाटील यांना सांगलीतून उमेदवारी देण्यात आली.

भाजपची पहिली यादी जाहीर

1) नागपूर – नितीन गडकरी
2) बीड – गोपीनाथ मुंडे
3) चंद्रपूर- हंसराज अहिर
4) गडचिरोली -अशोक नेते
5) भंडारा-गोंदिया – नाना पटोले
6) अकोला – संजय धोत्रे
7) जालना – रावसाहेब दानवे
8) जळगाव – ए.टी. पाटील
9) दिंडोरी – हरिषचंद्र चव्हाण
10) पालघर – चिंतामन वनगा
11) उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी
12) सांगली – संजयकाका पाटील
13) धुळे – सुभाष भामरे
14) नांदेड – डी.बी. पाटील
15) ईशान्य मुंबई- किरीट सोमय्या
16 ) रावेर – हरिभाऊ जावळे
17 ) अहमदनगर – दिलीप गांधी

 

close