नासाने लावला 715 नव्या ग्रहांचा शोध

February 27, 2014 11:19 PM0 commentsViews: 425

346nasa27 फेब्रुवारी : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने 715 नव्या ग्रहांचा शोध लावल्याची घोषणा केलीय. 305 वेगवेगळ्या तार्‍यांभोवती हे ग्रह फिरत आहेत.

यांचा शोध नासाच्या केपलर स्पेस टेलिस्कोपनं लावलाय. या 715 ग्रहांपैकी चार ग्रहांवर सजीवसृष्टी निर्माण करणं शक्य असल्याचं नासाचं म्हणणं आहे.

यापूर्वी जवळपास हजार नव्या ग्रहांचा शोध लागलाय. पण एकाचवेळी इतक्या ग्रहांचा शोध लागण्याची ही पहिलीच घटना आहे.

close