पाकिस्तानमधला तणाव वाढला

March 11, 2009 11:51 AM0 commentsViews: 1

11 मार्चपाकिस्तामधली परिस्थिती आणखी चिघळली आहे. विरोधी पक्षातर्फे आता सरकार विरोधात आंदोलन आणि रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारनं विरोधकांचं अटकसत्र सुरू केलं आहे. इमरान खान यांच्याविरुध्द अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. संध्याकाळी लष्कराला नागरी भागात पाचारण करण्यात येणार आहे.विरोधकांची धरपकड करून पाक सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. पाकिस्तानात जे काही सुरू आहे त्यानुसार परवेझ मुशर्रफ युगाची पुन्हा सुरुवात होत असल्याची चिन्हे आहेत असं नवाब शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. दरम्यान एका रॅलीत केलेल्या भाषणात नवाब शरीफ यांनी आसिफ अली झरदारी यांच्यावर आरोपांची तोफ डागली आहे. पाकिस्तानमधल्या स्वात सारख्या प्रदेशातील परिस्थिती अतिशय नाजूक आहे. लोकांना खायला अन्न मिळतं नाही. बेरोजगारी वाढत आहे. अनेक ठिकाणी वीज,गॅस मिळत नाही असं असून देखील आसिफ अली झरदारी अनेक ठिकाणची राज्य सरकार बरखास्त करण्यात मग्न आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करावं अशी त्यांनी मागणी केली. या आधी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख अश्फाक परवेझ कियानी यांनी सुद्धा देशातली परिस्थिती सुधारा, देश चालवता येत नसेल तर सत्ता सोडा असा इशारा दिला होता. दरम्यान लष्करानं अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना पाकिस्तानबाहेरच राहण्याच्या सूचना केल्याचं समजतंय. ते सध्या तेहरानमध्ये आहेत.

close