… तर मी राजकारण सोडून देईन – नितीन गडकरी

February 28, 2014 12:46 PM5 commentsViews: 5283

Image nitin_gadakri_vs_keriwal_300x255.jpg28 फेब्रुवारी :  आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांचा चर्चा चांगलाचं रंगताणा दिसत आहे. आपच्या नागपूरच्या उमेदवार अंजली दमानिया यांनी भाजपचे माजी अध्यक्ष  नितीन गडकरी यांनी उत्तर देत, जर ‘आप’ने केलेले आरोप सिद्ध केले तर मी राजकारण सोडून देईन असं म्हटलं आहे.

नितीन गडकरी यांनी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मानहानी केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. त्या संदर्भात  आज (शुक्रवार) दिल्लीत उच्च न्यायालयाने आज आप नेते अरविंद केजरीवाल यांना समन्स बजाविले आहे.

‘केजरीवाल यांना असे बदनामीकारक व बिनबुडाचे आरोप करण्याची सवय असून जर आपने आरोप सिद्ध केले तर राजकारण सोडेन असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी ३१ जानेवारीला दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप अशा विविध पक्षातील बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. भ्रष्ट नेत्यांची यादीच त्यांनी प्रसिद्ध केली होती.  निवडणुकीत भ्रष्ट नेत्यांविरोधात आप रिंगणात उतरेल, असा इशारा केजरीवाल यांनी यावेळी दिला होता.

भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुरेश कलमाडी, मुलायमसिंह यादव, अर्थमंत्री पी. चिदम्बरम, जगमोहन रेड्डडी, कपिल सिब्बल, फारूक अब्दुल्ला यांच्यासह १६२ नेत्यांचा केजरीवाल यांच्या यादीत समावेश आहे.

याप्रकरणी नितीन गडकरी यांनी केजरीवाल यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.  या प्रकरणातील सुनावणीत न्यायालयाने केजरीवाल यांना समन्स बजावले आहेत.  त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल व गडकरी यांच्यामधील संघर्ष अधिक पेटण्याची शक्‍यता आहे.

 • aazaad hindustaani

  केजरीवाल खरच प्रामाणिकपणे काम करत आहेत …मानल आपण… लोकपाल आल्यशिवाय काही सुधारणा होणार नाही …हे सगळ्यांना माहित आहे… तो माणूस त्याचा साठी पर्यंत करत आहे….पण काही लोकांना ते आवडत नाही…मुखय्मन्त्रि म्हणजे आदर्श घोटाळा अस काही तरी करणारा ..किवा लोकासाठी काहीच न करणारा असावा..उगाच जास्त कामे करू नयेत…असा हवा आहे….!!!!!!!!!!……

  • Naru.dev

   Jo Kejriwal ne delhit kel te maharatshtrat karnyacha prayatna chalu ahe…kahi mediala hatashi dharun charchet rahaych..watarwaran nirman karayach..ani nanatr palun jayach…

  • Suyog Gore

   (Y)

 • aazaad hindustaani
  • Santosh Raskar

   See the relativity of this news. If people don’t know other aspects of this news then they will think Gadkari is guilty. Which is not real. This was only to pull down Gadkari from his president post of BJP.

close