दिल्लीत आज कॅबिनेटची बैठक

February 28, 2014 9:30 AM0 commentsViews: 236

Image img_220372_pmcabinet_240x180.jpg28 फेब्रुवारी :  कॅबिनेटची आज दिल्लीत बैठक होतेय. लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्याच्या आधी लोकप्रिय निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल कारण निवडणुकीच्या आधीची ही शेवटची कॅबिनेट बैठक असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिअरनेस अलाऊंन्स बेसिक सॅलरीमध्ये जमा करत सरकारी कर्मचार्‍यांसाठी पगारवाढ जाहीर होण्याची शक्यता आहे.

याशिवाय एम्पॉईज पेशन्स स्कीमच्या सदस्य असणार्‍यासाठी किमान 1000 रुपयांच्या पेन्शनची तरतूद मान्य होण्याचीही शक्यता आहे. याशिवाय अपंगाधिकार कायदा आणि राहुल गांधींनी पुढाकार घेतलेल्या 5 भ्रष्टाचार विरोधी विधेयकांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

याशिवाय अजेंड्यावर नसलेल्या आणखीन एका गोष्टीवर चर्चा होण्याची शक्यता आहे, ती म्हणजे – आंध्र प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयी चर्चा आजची कॅबिनेट बैठकीत होण्याची शक्यता आहे.

close