सेनेचे यादी जाहीर -सरांना नारळ, शेवाळेंना उमेदवारी

February 28, 2014 3:32 PM6 commentsViews: 9127

new28 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीच्या नंतर आता शिवसेनेनंही आपली पहिली यादी जाहीर केली आहे. भ्रष्टाचाराचा निषेध करत शिवसेनेनं आघाडी सरकारचा पुतळा जाळला आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 15 उमेदवारांची यादी जाहीर केली.

 

पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींना अपेक्षेप्रमाणे नारळ देण्यात आलंय. त्यांच्या जागी मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आलीय. तसंच कल्याणमध्ये आनंद परांजपे राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळे परांजपेंच्या विरोधात शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. ठाण्यात राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आलीय.

 

कोकणात राणेंच्या बालेकिल्ल्यात सिंधुदुर्गमधून विनायक राऊत यांनी उमेदवारी देण्यात आलीय. यवतमाळमधून भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर झालीय. तर औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरेंनी आपली जागा कायम राखली असून चौथ्यांदा ते रिंगणात उतरणार आहे. दर दुसरीकडे महायुतीचा शब्द पाळत हातकणंगलेची जागा महायुतीनं राजू शेट्टींसाठी तर सातार्‍याची जागा आरपीआयसाठी सोडलीय. माढ्यातल्या उमेदवारीची घोषणा नंतर करण्यात येणार असल्याचं उद्धव यांनी स्पष्ट केलं.

अशी सेनेची यादी

 

 • बुलडाणा – प्रतापराव जाधव
 • अमरावती – आनंदराव अडसूळ
 • यवतमाळ – भावना गवळी
 • परभणी -संजय जाधव
 • कल्याण – डॉ. श्रीकांत शिंदे
 • मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
 • मुंबई उत्तर-पश्चिम – गजानन किर्तीकर
 • मुबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे
 • रायगड – अनंत गीते
 • रत्नागिरी – सिंधुदुर्ग – विनायक राऊत
 • ठाणे – राजन विचारे
 • हिंगोली – सुभाष वानखेडे
 • औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
 • रामटेक – कृपाल तुमाणे
 • शिरूर – शिवाजीराव आढळराव पाटील
 • सातारा रामदास आठवलेंसाठ
 • हातकणंगले राजू शेट्टीसाठी

 

 • aazaad hindustaani

  BJP vs AAP new joiners

  • rahulil.com

   VK SINGH.. SATYAPAL SINGH.. kuthe gelet?

   LATA MANGESHKARANCHA SUPPORT KUNALA???

   PRASHANT BHUSHAN KASHMIR KONALA DETO?? KUNACHI BAJU GHETO..

   HINDU DEVI DEVTANCHA APMAN KUMAR BAKWAS NAHI KARAT KA??

   DE UTTAR

 • aazaad hindustaani

  एक गोष्ट मान्य करावी लागेल कि केजरीवाल खूप हुशार माणूस आहे आणि आपणा सर्वांसाठी लढतोय. जे संविधान आणि जी घटना जनतेसाठी लिहिली गेली तिची ह्या प्रतिष्ठित राजकारण्यांनी स्वताच्या फायद्यासाठी किती वाट लावली आहे हे तुम्हा आम्हाला श्रीमंत आणि गरिबा मधल्या फरकाने स्पष्ट दिसतंय. आता सामान्य माणूस जागा होतोय. आम्ही केजरीवालच्या मागे उभे आहोत. केजरीवाल तुम आगे बढो हम तुम्हारे साथ ही.

 • aazaad hindustaani

  केजरीवाल आम्ही तुमच्या सोबत आहोत. भ्रष्टाचार्यांचे दुकान बंद करा.

 • aazaad hindustaani

  केजरीवाल खरच प्रामाणिकपणे काम करत आहेत …मानल आपण… लोकपाल आल्यशिवाय काही सुधारणा होणार नाही …हे सगळ्यांना माहित आहे… तो माणूस त्याचा साठी पर्यंत करत आहे….पण काही लोकांना ते आवडत नाही…मुखय्मन्त्रि म्हणजे आदर्श घोटाळा अस काही तरी करणारा ..किवा लोकासाठी काहीच न करणारा असावा..उगाच जास्त कामे करू नयेत…असा हवा आहे….!!!!!!!!!!

 • Mondrahul

  anyway Satara seat UdyanRaje is going to win easily, seat to RPI is just a show…..

close