होऊ दे खर्च,बिगर सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्यात वाढ

February 28, 2014 12:55 PM1 commentViews: 1995

Image img_76892_cartoonmoney_240x180.jpg28 फेब्रुवारी : निवडणुका डोळ्यासमोर ठेवत केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या खुश करण्याचा प्रयत्न केलाय. सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्यात वाढ करण्यात आलीय. सरकारच्या ईपीएफओ (EPFO) योजनेअंतर्गत येणार्‍या बिगर सरकारी कर्मचार्‍यांना दरमहा हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे.

यापूर्वी कर्मचार्‍यांना 90 टक्के डीए दिला जात होता. आता नव्या निर्णयानुसार कर्मचार्‍यांना 100 टक्के डीए मिळणार आहे. या निर्णयामुळे 50 लाख कर्मचारी आणि 30 लाख सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. तसंच लोकसभा निवडणूक प्रचारासाठीच्या खर्चाची मर्यादा वाढवण्यात आलीय.

आंध्र प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भ्रष्टाचारविरोधी विधेयकं अध्यादेश काढून लागू करण्याचा सरकारचा इरादा होता. पण, हा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत बारगळला.

  • Shridhar Venkat Bawale

    10 VARSHA NANTAR MINISTERSLA ANI GOVT. EMPLOYEES LA 50% SALARY CUT MADEY KAAM KARALA LAGNAR AHAI, KARAN TIJURI PAISE NASNAR KIWA WORLD BANK KODUN LOAN (KARZA) KADALA LAGNAR ANI INTEREST BARALAI SUDDHA PAISE NASNAR. WAH MAHARASHTA WAH ADANI PRAJA CHA ADANI RAJA

close