भुजबळ -कलमाडी गोत्यात

February 28, 2014 4:09 PM0 commentsViews: 2975

bhujbal kalmadi28 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झालीय. पण रिंगणात उतरण्या अगोदरच भुजबळ अडचणीत सापडले आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने छगन भुजबळांवर ठपका ठेवलाय.

तसंच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा, अशी शिफारस केलीय. तसंच युथ कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांच्यावरही ठपका ठेवलाय. आज (शुक्रवारी) सकाळी लोकलेखा समितीने आपला अहवाल सादर केला. त्यात भुजबळ आणि कलमाडी यांच्यावर ताशेरे ओढले आहे.

दिल्लीतलं महाराष्ट्र सदन, मुंबईत हायमाउंट रोडवर उभारलेलं गेस्ट हाऊस आणि अंधेरी आरटीओ इमारत या इमारतींच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा ठपका लोकलेखा समितीनं ठेवलाय. या सर्व प्रकल्पांमध्ये विकासकाला 20टक्के नफा देणं अपेक्षित होतं. पण, त्याऐवजी तो 50 टक्के देण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्पेशल इन्वेस्टिगेश टीम म्हणजेच एसआयटीकडून चौकशी करावी, अशी शिफारस या अहवालात करण्यात आलीय.

काय आहे महाराष्ट्र सदन गैरव्यवहार ?

नोव्हेंबर 2006 मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला. 16,000 चौरसमीटर जागेवर दिल्लीतील महाराष्ट्र सदनची नवी इमारत बांधण्याचा…डिसेंबर 2006 मध्ये केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या इमारतीची पायाभरणीही झाली. के. एस. चमणकर यांना बांधकामाचं हे कंत्राट 52 कोटी रुपयांना देण्यात आलं होतं. मात्र बांधकाम पूर्ण होईपर्यंत याची किंमत 150 कोटीवर पोहचली. कस्तुरबा गांधी मार्गावर उभ्या राहिलेल्या या प्रशस्त इमारतीचं कोडकौतुक होण्याआधीच त्याची कंत्राटं वादात सापडली होती.

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या खात्याअंतर्गतच महाराष्ट्र सदनाचा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आणि या संपूर्ण व्यवहारात स्वत: भुजबळ यांच्याच नातलगांना उपकंत्राटं देण्यात आली असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे हा सगळा प्रकार प्रॉफिट ऑफ ऑफिस ??? ऑफिस ऑफ प्रॉफिट???? असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, छगन भुजबळ यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. आरोप जर सिद्ध झाले तर राजकारण सोडून देईन असं भुजबळांनी स्पष्टच करुन टाकलं. पण नातलगांना उपकंत्राटं
मिळाल्याचं मात्र ते नाकारलं नाही.

याना  कंत्राटाचे वाटप

  • के. एस. चमणकर (कंत्राटदार)
  • ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर (भुजबळांच्या सहकार्‍यांची कंपनी)
  • आयडीन फर्निचर भुजबळांच्या सुनांची कंपनी)
  • प्राईम बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स (धनपत सेठ यांची कंपनी)
  • रॉयल एंटरप्रायझेस (धनपत सेठ यांची दुसरी कंपनी)
  • निचे (NICHE) इन्फ्र ास्ट्रक्चर (संचालक: समीर आणि पंकज भुजबळ)
close