नाशिक शिवसेना जिल्हाप्रमुखावर पैसे घेतल्याचा आरोप

March 11, 2009 7:41 AM0 commentsViews: 7

11 मार्च नाशिकनिरंजन टकले लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय धुळवडीलाही सुरुवात झाली आहे. नाशिक महानगरपालिकेतले अपक्ष नगरसेवक जे.टी.शिंदे यांनी स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि शिवसेनेचे लोकसभेचे इच्छुक उमेदवार दत्ता गायकवाड यांनी त्यांच्याकडून 27 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा खळबळजनक आरोप केला. शिंदे यांनी पत्रकारांना सांगितलं, पक्षनिधी म्हणून 12 लाख आणि त्यांच्या काही ऍडजस्टमेंटसाठी 15 लाख असे एकूण 27 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले आहेत. ते पैसे जर आपल्याला आठ दिवसात परत मिळाले नाही तर शिवसेना भवनसमोर आमरण उपोषण करू. तसंच दत्ताजी गायकवाड यांना जर लोकसभेची उमेदवारी दिली तर सहाही मतदारसंघात त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागरण उभं करू असं सांगितलं.यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी या आरोपांचा इन्कार करत, " लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला चांगलं वातावरण असल्यानं विरोधकांनी हे मुद्दाम घडवून आणलं आहे. तसंच नगरसेवक शिंदे यांनी केलेल्या आरोपांच्या विरोधात आम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू असं सांगितलं आहे.नाशिक लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्या आधीच या राजकीय धुळवडीला सुरुवात झाल्यानं नाशिकची निवडणूक रंगतदार होणार हे आता स्पष्ट झालं आहे.

close