माढ्यात भाऊबंदकी उफाळली, प्रतापसिंह RPIकडून रिंगणात ?

February 28, 2014 11:18 PM0 commentsViews: 6056

pratapsingh mohite28 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीत माढ्याच्या उमेदवारीवरून मोहिते-पाटील कुटुंबात पुन्हा एकदा भाऊबंदकी उफाळून आलीये. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भावा-भावांत भांडणं लावल्याचा गंभीर आरोप माजी सहकारमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी केलाय.

गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण माघार घेतली होती, मात्र आता कोणीही उमेदवारी दिली नाही तरी आपण निवडणूक लढवूच असा निर्धार प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी बोलून दाखवला. मागीलनिवडणुकीत शरद पवारांना पाठिंबा दिला होता.

पण यावेळी पवार असं करतील याची मला जाणीव नव्हती पण पवारांनी विजयसिंहांना उमेदवारी देऊन भावा-भावांत भांडण लावण्याचं काम केलं असा आरोप प्रतापसिंह पाटील यांनी केला तसंच आरपीआयचे नेते रामदास आठवले माझे चांगले मित्र असून त्यांनी उमेदवारी दिली तर आपण स्वीकारण्यास तयार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.

close