उमेदवारीमुळे भुजबळ नाराज?, येवल्यात कडकडीत बंद

March 1, 2014 4:47 PM0 commentsViews: 5589

BHUJBAL ON MUNDE301 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर होऊ दोन दिवस उलटत नाही तेच नाराजांनी झेंडे फडकावले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानं राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे.

आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांच्या येवला या विधानसभा मतदारसंघात आज (शनिवारी)क डकडीत बंद पाळण्यात येत आहे. आज सकाळपासून येवल्यातली सर्व दुकानं आणि व्यवहार बंद आहेत. येवल्यातल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोही केला.

भुजबळांना येवल्यातच राहू द्यावं, लोकसभेसाठी पाठवू नये, अशी मागणी भुजबळांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांकडे त्यांनी तशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीची संभाव्य यादी जाहीर तयार झाली तेव्हापासूनच भुजबळ नाराज होते. लोकसभा लढवण्याची त्यांची तयारी नव्हती असं सूत्रांकडून कळतंय. पण शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे भुजबळांना काही करता आले. अगोदरच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भुजबळ गोत्यात सापडले आहे. भुजबळ जरी आरोप मान्य करत नसले तरी लोकांच्या नाराजीला सामोरं जाण्या अगोदरच कार्यकर्त्यांनी पाऊल उचल्याचं दिसतंय.

close