माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग भाजपमध्ये

March 1, 2014 3:47 PM1 commentViews: 596

v k singh in bjp01 मार्च : माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी आज (शनिवारी) अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थित सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

व्ही. के सिंग यांच्यासोबत अनेक माजी लष्करी अधिकार्‍यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप हा राष्ट्रीय विचारसरणीचा पक्ष असल्यानं आपल्याला देशाची सेवा करण्याची संधी मिळेल. म्हणूनच भाजपमध्ये प्रवेश केल्याचं व्ही. के. सिंग यांनी यावेळी सांगितलं.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी अमर जवान ज्योतीवर जाऊन आदरांजली वाहिली. विशेष म्हणजे व्ही.के.सिंग ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनात सहभागी झाले होते. अण्णांनी राळेगणसिद्धीमध्ये उपोषणाला बसले होते तेव्हा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सहभागावरुन गोंधळ घातला होता. व्ही.के.सिंग भाजपच्या नेत्यांना भेटतात असा आरोपही केला होता.

अखेर आज व्ही.के.सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन एकाप्रकारे आरोपांमध्ये तथ्य असल्याचं सिद्ध करुन दिलंय. तसंच अण्णांच्या सहकारी किरण बेदी यांनीही अलीकडेच भाजपला पाठिंबा दिला होता. आता अण्णांचे अलीकडचे सहकारी व्ही.के. सिंग भाजपमध्ये दाखल झाले आहे.

  • Suraj Shah

    SOME MORE

close