‘आप’ने पाठवली गडकरींच्या घरी पुराव्याची फाईल

March 1, 2014 4:12 PM8 commentsViews: 2463

damania vs gadkari01 मार्च : आम आदमी पार्टी विरुद्ध भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यातील निकार्‍याच्या लढाईने नवे वळण घेतले आहे. आज शनिवारी ‘आप’ने नितीन गडकरी यांच्या घरी भ्रष्टाचारासंदर्भातील पुराव्याची फाईल पाठवली आहे. गडकरींच्या घरी त्यांच्या पीएने ही फाईल स्विकारली आहे.

शुक्रवारी नितीन गडकरी यांनी आपल्याविरोधात कुणी एक रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध केलं तर आपण राजकारण सोडून देवू असं सांगितलं होतं. यावर आम आदमी पार्टीच्या नागपूरच्या उमेदवार अंजली दमानिया यांनी आज पुरावे देण्याचं जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी पुराव्याची फाईलच गडकरींच्या घरी पाठवून दिली. आज चार वाजेपर्यत गडकरींनी यावर उत्तर पाठवावं, असं अंजली दमानिया यांनी सांगितलंय.

विशेष म्हणजे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केली होती. या यादीत नितीन गडकरी यांच्या भ्रष्ट नेते म्हणून उल्लेख केला होता. आपच्या यादीमुळे नितीन गडकरी यांनी केजरीवाल यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. आपल्या नेत्याला कोर्टात खेचल्यामुळे साहजिकच ‘आप’चे कार्यकर्ते संतप्त झाले. ‘आप’च्या सदस्या अंजली दमानिया यांनी गडकरींच्या विरोधात अधिक आक्रमक होत पुरावे पे पुरावे दिले आहे. आता गडकरी काय भूमिका घेता याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

 • उमेश मुंडले

  आप चे कार्यकर्ते इतके मूर्ख आहेत कि त्यांना फक्त गडकरींची बदनामी करायची आहे ? जर गडकरी यांनी या संदर्भात कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे तर जे काही पुरावे आहते ते कोर्टात जाऊन मांडावे , गडकरींच्या घरी पाठवून काय करणार ?

  • Tejas

   भारतात पहिल्यांदा आले नसाल तर तुम्हाला माहित असेल कि कोर्टात आरोप सिद्ध व्हायला अजून ५ लोकसभा निवडणुका व्हाव्या लागतील.

   जर तुम्ही स्वतः कोणत्या प्रकारे मदत करू शकत नसाल तर कमीत कमी विरोध तरी करू नका.

   • उमेश मुंडले

    दमानिया आणि केजरीवाल यांना गडकरींची माफी मागावी लागेल.हे आरोप खोटे आहेत .न्यायालयात सिद्ध होईल.

  • Chinmay Damle

   उमेश, एवढे जार आपच्या नेत्यांना समजले आसते तर काय काय झाले असते!!!

 • Naru.dev

  पण, फाईल गाड्कारीच्या घरी कशाला पाठवली?? एक वर्ष झाले असलेच नाटक चालू आहे आप चे..इतका वेळ लागतो का FIR दाखल करायला…जे केज्रीवाल्ने दिल्लीत केल (मेडिया चा उपयोग घेऊन पोपुलर होणे) तेच हि बाई करत आहे..

 • Akhilesh Yadav

  Read again – शुक्रवारी नितीन गडकरी यांनी आपल्याविरोधात कुणी एक रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध केलं तर आपण राजकारण सोडून देवू असं सांगितलं होतं. यावर आम आदमी पार्टीच्या नागपूरच्या उमेदवार अंजली दमानिया यांनी आज पुरावे देण्याचं जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी पुराव्याची फाईलच गडकरींच्या घरी पाठवून दिली. आज चार वाजेपर्यत गडकरींनी यावर उत्तर पाठवावं, असं अंजली दमानिया यांनी सांगितलंय.

  • Sandip Bhoi

   करणार्‍याला त्याच्याच घोटाळ्यांचे पुरावे त्यालाच द्यायचे असतात का? गडकरींना फाइल देऊन काय होणार आहे खरच मला काळाले नाही. ताईंना असे वाटते का की गडकरींनी न कळट घोटाळा केला आणि फाइल पाहून साक्षात्कार होईल आणि गडकरी पाय उतार होतील.

 • Sandip Bhoi

  गडकरींना फाइल देऊन काय होणार आहे खरच मला काळाले नाही. ताईंना असे वाटते का की गडकरींनी न कळट घोटाळा केला आणि फाइल पाहून साक्षात्कार होईल आणि गडकरी पाय उतार होतील.

close