नरेंद्र मोदी आणि अंबानींची सेटिंग -केजरीवाल

March 1, 2014 4:48 PM0 commentsViews: 878

kejriwal modi01 मार्च : दिल्लीचे तख्त सोडल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी देशभरात झाडू यात्रेला उत्तरप्रदेशमधून सुरूवात केलीय. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींवरून काँग्रेस आणि मोदींवर टीका केली. काँग्रेसने हा देश मुकेश अंबानी विकला आहे.

याबद्दल राहुल गांधी यांना पत्र तर लिहलेच पण भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनीही पत्र लिहले पण त्यांनी याचे उत्तर दिले नाही. याचा अर्थ मोदी आणि अंबानींची सेटिंग झालीय असा आरोप केजरीवाल यांनी केला. तसंच येत्या 1 एप्रिलपासून गॅसचे दर वाढणार असून त्यामुळे महागाई वाढणार आहे असा दावाही केजरीवाल यांनी केला.

आज (शनिवारी) केजरीवाल यांनी आपल्या झाडू यात्रेला उत्तर प्रदेशातल्या पिलखुवामधून सुरूवात केली. आजपासून ते तीन दिवस उत्तर प्रदेशात रोड शो करणार आहेत. उत्तरप्रदेश हा सर्वात जास्त मतदारसंघ आहे त्यामुळे त्यांनी पहिली निवड ही उत्तरप्रदेश केली. उद्या त्यांची कानपूरमध्ये जाहीर सभा घेणार आहे.

केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभेसाठी मैदानात उतरले. ‘शीला हारी अब मोदी की बारी है’ असं म्हणत  केजरीवाल यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्यावर टीका करत केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. मोदी पंतप्रधान झाल्यावर रिलायन्सला गॅससाठी किती दर देणार असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला.

पण मोदींनी केजरीवाल यांच्या प्रश्नाकडे सपेशल पाठ फिरवली. मोदी आपल्या प्रश्नांना उत्तर देतील या अपेक्षेनं केजरीवाल यांचा खटाटोप अजूनही सुरूच आहे. आज उत्तरप्रदेशमध्ये झाडू यात्रेला सुरूवात केली यावेळी त्यांनी मोदी आणि अंबानींची सेटिंग झाली असा गंभीर आरोप केलाय. तसंच गॅसदरवाढीच्या परवानगीमुळे आता जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती 1 एप्रिलपासून वाढणार असल्याचा दावाही केला.

close