अर्जुन आणि आलियाचा ‘2 स्टेटस्’

March 1, 2014 6:41 PM0 commentsViews: 1377

‘हायवे गर्ल’ आलिया भट्ट आणि ‘गुंडे’फेम अर्जुन कपूर आता एकत्र दिसणार आहे ते ‘टू स्टेटस्’ या चित्रपटाच्या निमित्ताने..अलीकडेच या चित्रपटाचा प्रोमो रिलीज झालाय. या चित्रपटात आलिया साऊथ इंडियन मुलीची भूमिका साकारात आहे तर अर्जुन कपूर पंजाबी मुलाची भूमिका साकारतोय. या चित्रपटाची कथा ही प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या 2 स्टेट्स या कांदबरीवर आधारीत आहे. तसंच या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री रेवती आणि अमृता सिंह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 18 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे..या सिनेमाची हा खास झलक..

close