संजय मंडलिक शिवसेनेत दाखल

March 1, 2014 7:10 PM1 commentViews: 1952

sanjay mandlik01 मार्च : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा मुलगा संजय मंडलिक यांनी आज (शनिवारी) शिवसेनेत प्रवेश केला आहे. संजय मंडलिक यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला.

यावेळी संजय राऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थिती होते. सेनेत प्रवेशामुळे संजय मंडलिक कोल्हापूरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. सेनेनं दोन दिवसांपूर्वी 15 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. या यादीत कोल्हापूरमध्ये अजून कुणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही.

कोल्हापूरमध्ये मंडलिक यांचे चांगलंच वर्चस्व आहे त्यामुळे संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय महाडिक यांच्याशी थेट लढत पाहण्यास मिळेल.  दरम्यान, कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेसनं राष्ट्रवादीला दिल्यानं सदाशिवराव मंडलिक नाराज आहेत.

  • Nilesh

    Aj tagayat kasdar ki Chya babtit kolhapur matdarsanga tun Indian National Congress , Apaksh , ani ata Rashtra Vadi Congress yenyachi dat Shakyata ahe .Thank You.

close