भुजबळांना धक्का, MET प्रकरणी कोर्टाची पोलिसांना नोटीस

March 1, 2014 6:47 PM0 commentsViews: 934

Image img_197412_metbhujbaltrust_240x180.jpg01 मार्च : लोकलेखा समितीच्या अहवालातील ताशेर्‍यांपाठोपाठ छगन भुजबळ यांना आणखी एक धक्का बसला आहे. एमईटी प्रकरणी भुजबळ कुटुंबीयांबाबत कर्वे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत मुंबई पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं पालन न केल्याबाबत सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना कंटेम्ट ऑफ कोर्टाची नोटीस बजावली आहे.

तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्यासह तिघांना नोटीस बजावली असून चार आठवड्यांची मुदत दिलीय. मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या 178 कोटींच्या कथित घोटाळ्याबाबत सुनील कर्वे यांनी दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना नोटीस बजावली आहे.

सुनील कर्वेंच्या याचिकेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने पोलिसांना भुजबळ कुटुंबीयांवर आठ आठवड्यात कारवाईचे आदेश दिले होते. मात्र मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करता येणार नाही असा दावा केला. त्यावरुन न्यायमूर्ती बी.एस.चौहान आणि न्यायमूर्ती चलमेश्वर यांच्या खंडपीठाने शुक्रवारी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलीये.

close