चितळे समितीचा अहवाल सादर, निष्कर्षासाठी हवी आणखी मुदत

March 1, 2014 9:06 PM1 commentViews: 309

4865chitale01 मार्च : बहुचर्चित सिंचन घोटाळ्याची चौकशी करणार्‍या चितळे समितीचा अहवाल आज (शनिवारी) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर करण्यात आला.

या विशेष चौकशी समितीचे अध्यक्ष माधवराव चितळे यांनी स्वत: 1361 पानी अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. या वेळी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. पण चितळे समितीनं अहवालाचा निष्कर्ष काढण्यासाठी 15 दिवसांची मुदत मागितली आहे. यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

31 डिसेंबर 2012 ला स्थापन झालेल्या चितळे समितीने 1 वर्ष दोन महिने चौकशी केली. 19 प्रकल्पांना समितीनं भेट देऊन अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि सरकारी अधिकार्‍यांची साक्ष घेतली. त्यानंतर आज अहवाल सादर केला पण निष्कर्ष काढण्यासाठी आणखी 15 दिवसांची मुदत मागितली आहे.

close