‘यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची’

March 1, 2014 9:49 PM0 commentsViews: 594

01 मार्च : महाराष्ट्र शासन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निमित्त ‘यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची’ हा चित्रपट 14 मार्चला रिलीज होतोय. पहिल्यांदाच यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात यशवंतराव चव्हाण यांची भूमिका अशोक लोखंडे यांनी केलीय. या चित्रपटाचं दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांचं असून चित्रपटाला संगीत आनंद मोडक यांनी दिलंय. या चित्रपटाविषयी माहिती देण्याकरता आज (शनिवारी) पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.

close