चीनच्‍या रेल्‍वे स्‍थानकावर दहशतवादी हल्‍ला, 28 जणांचा मृत्‍यू , 30 जण जखमी!

March 2, 2014 12:19 PM0 commentsViews: 262

china terror attack02 मार्च :  चीनमधील एका शहरातील रेल्वे स्थानकावर एका माथेफिरूंच्या टोळक्याने तब्बल २७ जणांची हत्या केली आहे. या टोळक्याच्या हल्ल्यात शंभराहून अधिक व्यक्तीं गंभीर जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे. चीनच्या दक्षिण भागात ही धक्कादायक घटना घडलेली आहे.

कुंसुत्रांनी सांगितले, की शनिवारी रात्री नऊ वाजेच्‍या सुमारास अज्ञात दहशवाद्यांनी रेल्‍वेस्‍थानकावर चाकूहल्‍ला केला. हल्‍यामागे कोण्‍ाता उद्देश होता याविषयी मा‍हिती अजून स्‍पष्‍ट झालेली नाही.

घटनास्‍थळावरील एका प्रत्‍यक्षदर्शीने दिलेल्‍या माहितीनुसार, दहशतवादी काळे कपडे परिधान करून  आले होते. त्‍यांच्‍यासोबत चाकूसारखे मोठे हत्‍यार होते. दहशतवाद्यांनी लोकांवर बेछुट हल्‍ला केला. हल्‍यात मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले.

तर स्‍थानीक टी. व्‍ही. चॅनलने दिलेल्‍या वृत्‍तानुसार पोलिसांनी दहशतवाद्यांचा खात्‍मा केल्‍याचे म्‍हटले आहे.

close