मोदी हे मानवतेचे खुनी- मुलायम सिंह

March 2, 2014 4:50 PM0 commentsViews: 474

mulayam singh02 मार्च :   ‘नरेंद्र मोदी हे मानवतेचे खुनी असल्याचा’ तीव्र हल्ला आज (रविवार) समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांनी चढविला. भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी पक्षाकडून भूतकाळात चूक घडली असल्यास मुस्लीमांची माफी मागण्याची तयारी दाखविल्यासंदर्भात केलेल्या विधानाचीही मुलायम सिंह यांनी खिल्ली उडवत, ते म्हणाले ‘आधी मानवतेची हत्या करायची आणि मग माफी मागयची, हे योग्या आहे का?’ असा सवालही त्यांनी विचारला.

अहमदाबादमधील एका प्रचार सभेदरम्यान बोलताना सिंह यांनी कॉंग्रेस पक्षावरही जोरदार टीका करत दोन्ही राष्ट्रीय पक्ष हे देशहित विरोधी असल्याचा आरोप केला.

त्याचबरोबर, सिंह यांनी विकास प्रारुपावरही टीका केली. ‘गुजरातमध्ये देशातील सर्वाधिक प्रदुषित नद्या आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. गुजरातमध्ये काहीही नाही,’ असे सिंग यांनी सांगितले.

देशातील गरीब व अल्पसंख्यांकांसाठी कॉंग्रेस पक्षाकडे कोणतीही धोरणे नसल्याचा आरोप सिंह यांनी केला असून कॉंग्रेस पक्षाच्या हातात देशाच्या सीमाही सुरक्षित नसल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. मोदी यांचा करिष्मा उत्तर प्रदेशमध्ये चालणार नाही, असा दावा सिंह यांनी यावेळी केला.

close