द.आफ्रिकेला चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाची ऑफर

March 11, 2009 5:13 PM0 commentsViews: 3

11 मार्चचॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेचं ठिकाण पुन्हा एकदा बदलणार आहे.पाकिस्तानातून चॅम्पियन्स ट्रॉफी रद्द झाल्यावर ती श्रीलंकेत होणार होती. पण आता ती दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आयसीसीचे कार्यकारी अधिकारी हरून लोगार्ट यांनी स्पर्धा आयोजनाची ऑफर दक्षिण आफ्रिकेला दिली आहे. पहिल्यांदा सुरक्षेच्या कारणास्तव चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा श्रीलंकेत हलवण्यात आली होती. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पावसाचं सावट स्पर्धेवर असल्यामुळे ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

close