अनोखा सन्मान

March 2, 2014 5:05 PM0 commentsViews: 658

02 मार्च :   विक्रमवीर सचिन तेंडुलकरच्या गौरवपूर्ण कामगिरीचा आज मुंबईत सन्मान करण्यात आला. वांद्रा इथे बॅट ऑफ ऑनर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नेटवर्क 18च्या पुढाकारानं हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी 2 टन वजनाच्या आणि 25 फूट लांब बॅटीचं अनावरण करण्यात आलं. सचिनच्या घरापासून जवळच ही बॅट विराजमान झाली. या कार्यक्रमाची आठवण म्हणून या स्टीलच्या बॅटची एक प्रतिकृतीही सचिनला भेट देण्यात आली. ही बॅट नामवंत डिझायनर आणि इंजिनिअर्सच्या मदतीने तयार करण्यात आलीय. सचिन तेंडुलकरचे करोडो चाहते, बांद्राचे नागरिक आणि समस्त मुंबईकरांसाठीच हा क्षण रोमांचकारी ठरला. कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.

close