पाकिस्तानसमोर 246 धावांचे आव्हान

March 2, 2014 6:02 PM0 commentsViews: 564

rohit sharma02 मार्च :   आशिया चषकाच्या सहाव्या सामन्यात आज भारताची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी असून भारताने 50 ओव्हरच्या समाप्तीपर्यंत 8 गडी गमावत 245रन्स केले आहेत.

रवींद्र जडेजा  52 आणि अमित मिश्रा 1 रन्सवर नाबाद राहिले आहेत. रोहितने उमर गुल आणि जुनैद खान यांच्या बोलिंगवर प्रत्येकी एक षटकार ठोकला. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन केवळ 10 रन्स काढून बाद झाला. त्याला मोहम्मद हफीजने बाद केले.

रोहित शर्माने शानदार अर्धशतक केले आहे. त्याने 58 चेंडूंत 56 रन्स केले आहेत. त्यात 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. कॅप्टन विराट कोहली स्वस्तात बाद झाला. त्याने केवळ 5 रन्स केले.  अजिंक्‍य रहाणे 50 चेंडूचा सामना करत 23 धावा काढून बाद झाला.  रायडूने 62 चेंडूचा सामना करताना 58 धावांचे योगदान दिले.

 

close