चेल्सी, लिव्हरपूल चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या क्वॉर्टर फायनलमध्ये

March 11, 2009 5:23 PM0 commentsViews: 9

11 मार्चचॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील क्वॉर्टर फायनलची लाईनअप स्पष्ट झाली आहेत. क्वॉर्टर फायनलला पोहचलेल्या आठ टीम आता निश्चित झाल्या आहेत. लिव्हरपूलने रिअल माद्रीदचा पराभव केला आणि सगळ्यात आधी क्वॉर्टर फायनलमध्ये जागा फटकावली. फर्नांडो टोरेस या मॅचमध्ये खेळणार की नाही याची उत्सुकता सगळ्यांना होती. पण टोरेस खेळलाही आणि त्यानेच 16व्या मिनिटाला पहिला गोल करून लिव्हरपूलला आघाडीही मिळवून दिली. 28व्या मिनिटाला कॅप्टन गेराडने पेनल्टीचा फायदा उचलत टीमचा दुसरा गोल केला. तिसराही गोल गेराडनेच केला.आंद्रे दोसेनाने मग चौथा गोल करत लिव्हरपूलला मोठा विजय मिळवून दिला. चेल्सीला मात्र ज्युवेंटस बरोबरची मॅच तितकी सोपी गेली नाही. इक्वेंटाने 19व्या मिनिटालाच गोल करून ज्युवेंटसला आघाडी मिळवून दिली होती. पण पहिल्या हाफला काहीच मिनिटं शिल्लक असताना मायकेल एशियनने चेल्सीला बरोबरी साधून दिली. दुस-या हाफमध्येही युवेंटस टीमने आक्रमण सुरूच ठेवलं.पण बॅलेंटीने बॉल हाताळल्यामुळे त्यांना पेनल्टी मिळाली आणि अलेक्झाड्रो डेल पियरोने संधीचा फायदा उचलून युवेंटसचा दुसरा गोल केला. अखेर डोब्रा चेल्सीच्या मदतीला धावून आला. मोक्याच्या क्षणी गोल करत त्याने मॅच बरोबरीत सोडवली. आणि सरस गोल सरासरीमुळे चेल्सी टीम क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचली.

close