रोमहर्षक लढतीत पाकिस्तानची भारतावर मात

March 2, 2014 9:34 PM0 commentsViews: 410

pak afri02 मार्च :    आशिया कपमध्ये रोमहर्षक लढतीत पाकिस्तानने भारतावर एक विकेट आणि दोन चेंडू राखून मात केली. पाकिस्तानतर्फे मोहम्मद हाफीजच्या ७५ धावा आणि अखेरच्या महत्त्वाच्या षटकांमघ्ये शाहीद आफ्रिदीच्या धुवांधार ३४ धावांच्या खेळीने पाकला विजय मिळवून दिला.

शेवटच्या षटकापर्यंत सामन्यात अत्यंत चुरस होती. शहीद आफ्रिदीला संधी मिळताच त्याच्या खेळी वरून सामना पाकिस्तानच्या खिशात जाण्याची पाकिस्तानी क्रिकेटरसिकांना खात्री पटली आणि आफ्रिदीनेही त्यांच्या विश्वासाला जगत त्याने साजेशी खेळी केली. ऐन वेळी ताकदीचे प्रदर्शन करत अवघ्या १८ चेंडूत आफ्रिदीने ३४ धावा केल्या, ज्यामध्ये २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

close