ऑल द बेस्ट! दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

March 3, 2014 10:40 AM0 commentsViews: 190

Thumb up emoticon03 मार्च :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावीची परिक्षा आजपासून सुरु होत आहे.या परिक्षेला नवीन अभ्यासक्रमानुसार 17 लाख 28 हजार 368 विद्यार्थी बसणार आहेत. यात 9,67,714 विद्यार्थी व 7,60,654 विद्यार्थीनी असतील. जुन्या अभ्यासक्रमानुसार 1,69,729 विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. हॉल तिकीटच्या घोळामुळे  गेले काही दिवस विद्यार्थी आणि पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागलाय.

दहावीच्या विद्यार्थ्यांना ऐनवेळी परिक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला तर जवळच्या परिक्षा केंद्रावर पेपर देता येईल अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेचं ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टीकल एक्झाम बुडली आहे, अशा विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परिक्षा 28 मार्च व 1 एप्रिल होणार आहे. खेळाडूंना पास होण्यासाठी गुण कमी पडत असल्यास 25 पर्यंत वाढीव गुण देण्यात येतील अशी माहिती दिली. बेस्ट ऑफ फाईव्ह नुसारच निकाल असेल हे देखील नमुद केल.

प्रवेशपत्रांचा घोळ कायमच 
दहावीची परीक्षा आजपासून, सोमवारपासून सुरू होत असताना, अद्याप परीक्षा प्रवेशपत्राचा घोळ कायम आहे. विद्यार्थ्यांना चुकीचे प्रवेशपत्र मिळाल्याने त्यात सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काल, रविवारीही बोर्डाकडे धाव घेतली. यावेळी बोर्डाद्वारे विद्यार्थ्यांना हाताने तयार केलेली प्रवेशपत्र देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परीक्षेच्या पहिल्या दिवशी गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे.

close