इस्थर अनुह्या हत्येप्रकरणी दोन संशयितांना अटक

March 3, 2014 11:28 AM0 commentsViews: 1066

ester03 मार्च :  हैदराबादची 23 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर इस्थर अनुह्या हिच्या हत्येचे गूढ उकलण्यात मुंबई पोलिसांना दोन महिन्यानंतर यश आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचच्या विशेष तपास पथकानं नाशिकमधून दोघांना ताब्यात घेतलं. चंद्रभान सानप असं त्या संशयित आरोपीचे नाव आहे. गेल्या दीड महिन्यापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता.

मुंबई पोलिस याबाबत लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन इस्थरच्या मारेकर्‍याला पकडल्याचे जाहीर करणार आहेत.

5 जानेवारीला हैदराबादहून मुंबईला आल्यानंतर इस्थर गायब झाली होती. 16 जानेवारीला कांजूरमार्गमध्ये अर्धवट कुजलेल्या अवस्थेत इस्थरचा मृतदेह सापडला होता. तेव्हापासून इस्थरच्या मृत्यूचा तपास म्हणजे पोलिसांसाठी आव्हान होऊन बसला होता.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीशी सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिलं जातंय. रेल्वे स्टेशनवरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये इस्थर एका व्यक्तीबरोबर जाताना दिसली होती. त्यामुळे त्या व्यक्तीचा इस्थरच्या नाहीशा होण्यामागे हात असावा असा संशय होता.

इस्थरचे कुटुंबीय मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

इस्थरचे मारेकरी सापडले?

  • 24 वर्षीय इस्थर अनुह्या मूळची आंध्र प्रदेशमधल्या विजयवाडामधली
  • सॉफ्टवेअर इंजिनियर, मुंबईत TCSमध्ये काम करत होती
  • 5 जानेवारी 2014 – मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसमधून बेपत्ता झाली
  • 16 जानेवारी 2014 – कांजूरमार्गजवळ ईस्टर्न हायवेच्या कडेला इस्थरचा मृतदेह सापडला
  • रेल्वे स्थानकावरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये इस्थरबरोबर एक अज्ञात व्यक्ती आढळली
close