मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

March 3, 2014 9:47 AM0 commentsViews: 250

local 3403 मार्च :  आठवड्याची सुरूवात अनेक मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेवरील कल्याणच्या दिशेने जाणार्‍या धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जवळपास तासाभरापासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

भायखळा आणि परळ दरम्यान जाऊन मार्गावर ओव्हरहेड वायर तुटलीय आणि त्यामुळं रेल्वे वाहतूकीवर परिणाम झालाय. या मार्गावरील लोकल गाड्या भायखळा ते दादर दरम्यान जलदमार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर दुरूस्ती होईपर्यंत चिंचपोकळी आणि करी रोड स्टेशनवर कोणतीही लोकल थांबणार नाही.

close