पाकिस्तानमध्ये अस्थिरता कायम

March 12, 2009 5:08 AM0 commentsViews: 3

12 मार्च इस्लामाबादपाकिस्तानची वाटचाल पुन्हा एकदा लष्करी राजवटीच्या दिशेनं सुरू झाल्याचं दिसतंय. पाकिस्तानमध्ये आजपासून सरकारविरोधात लाँग मार्च निघणार आहे. वकील, राजकारणी आणि समाजातल्या इतर क्षेत्रातल्या व्यक्ती या मार्चमध्ये भाग घेणार आहेत. देशातल्या वेगवेगळ्या भागातून या लाँग मार्चला सुरुवात होईल आणि 16 तारखेला तो राजधानी इस्लामाबादमध्ये धडकेल. दरम्यान नवाज शरीफ यांनी सरकारचे आदेश न पाळण्याचे आवाहन केल्याने देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.हा लाँग मार्च मोडून काढण्यासाठी बुधवारी विरोधी नेते आणि वकिलांची धरपकड करण्यात आली. असं असलं तरी इम्रानखानसह अनेक नेते भूमीगत झाले आहेत. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी तेहरानहून मायदेशी परतलेत. त्यांनी पंजाब प्रांतातल्या राज्यपालांच्या राजवटीचा फेरविचार करण्यासाठी एक बैठक बोलावली आहे. पंतप्रधान युसुफ रझा गिलानी आणि पंजाब प्रांताच्या गव्हर्नरची ते भेट घेतील. आता सरकारने कितीही प्रयत्न केले तरी 16 मार्चचा सरकार विरोधातला लाँग मार्च झरदारी सरकारला थांबवता येणार नाही असा इशारा नवाज शरीफ यांनी दिला आहे.

close