COEPमध्ये रेगाटा उत्सव

March 3, 2014 12:48 PM0 commentsViews: 71

03 मार्च :  कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग ऑफ पुणे तर्फे आयोजित 86 व्या रेगाटा उत्सव काल पार पडला. मुठा नदीच्या पात्रात झालेल्या साहसी असा बोंटींगच्या वेगवेगळ्या फॉरमेशन्स प्रेक्षक श्वास रोखून बघत होते. विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या सरावानंतर रेगाटा उत्साहात पार पडतो.

ऍरो फॉरमेशन, शेल गेम्स,कायक बॅलेट, टेलिमॅचेस, पंट फॉरमेशन्स मधून बोंटींगचे कौशल्य इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांनी दाखवले. महाभारताच्या संकल्पने अंतर्गत यावर्षीचा रेगाटा उत्सवाचं आयोजन करण्यात आल होता. 7 ते 8 हजार प्रेक्षकांची उपस्थिती हे यावर्षीच्या रेगाटाचे वैशिष्ट्य होत.या कार्यक्रमात स्वरुपवर्धिनीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या मल्लखांबाचे प्रात्यक्षिकही लक्षवेधी ठरलंय.

close