बिहारमध्ये युतीवरुन राहुल -सोनियांमध्ये मतभेद

March 3, 2014 1:08 PM0 commentsViews: 1133

rahul and soniya03 मार्च :   बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्यासोबत जावं की नितीश कुमार यांच्यासोबत जावं यावरून काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहे. सध्या काँग्रेस-आरजेडी एकत्र आहेत, मात्र जागावाटपावरुन दोन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकलेलं नाही.

आरजेडीनं देऊ केलेल्या जागा काँग्रेसला नको आहेत कारण तिथे काँग्रेसला विजय मिळणं कठीण आहे. त्याऐवजी काँग्रेसने मागितलेल्या मधुबनी आणि मोतीहारी जागा देण्यास आरजेडीनं नकार दिला आहे. लालूप्रसाद यादव यांच्याशी युती कायम ठेवण्यावरुन काँग्रेसमध्येच मतभेद आहेत.

त्यानंतर आता जेडीयूशी युती करण्याच्या पर्यायवर काँग्रेस गंभीरपणे विचार करत आहे. राहुल गांधी नितीशकुमार यांच्याशी युती करण्याच्या मताचे आहेत तर सोनिया गांधी यांचा कल हा लालूप्रसाद यांच्याकडे आहे. मात्र, रामविलास पासवान बाहेर पडल्यानंतर लालूंच्या ताठर पवित्र्यामुळे काँग्रेस नाराज आहे. याबाबत काँग्रेस आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. लालूंशी पुन्हा एकदा चर्चा करणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांकडून मिळाली आहे.

close