इस्लामाबाद कोर्टाच्या परिसरात आत्मघातकी हल्ला

March 3, 2014 11:58 AM0 commentsViews: 358

pakistan attack03 मार्च : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबमध्ये आज एका कोर्टाबाहेर आत्मघातकी हल्ला दहशतवाद्यांच्या हल्ल्यात न्यायाधीशांसह ११ जण ठार झाले आहेत. तर २० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी दोन अज्ञात बंदूकधा-यांनी न्यायालयाच्या आवारात अंदाधुंद गोळीबार केला तसेच हँडग्रेनेड्सही फेकले. गोळीबार व स्फोटामुळे संपूर्ण परिसरात गदारोळ माजला. गोळीबार सुरू झाल्यावर अनेक वकिलांनी आपापल्या कार्यालयांमधून पळून सुरक्षित ठिकाण गाठले, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

या हल्ल्यात एका न्यायाधीशासह ११ नागरिक ठार झाले तर २० हून अधिक नागरिक जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

close