बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंविरोधात सुरेश धस रिंगणात

March 3, 2014 2:50 PM1 commentViews: 2903

dhas X munde03 मार्च : भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा बाल्लेकिल्ला अर्थात बीडमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपला उमेदवार उभा केला आहे.
बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीने मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात बीडमधल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं.

 

मागील आठवड्यात राष्ट्रवादीने आपल्या 18 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात बीड , हिंगोली, मावळ आणि हातकणंगलेच्या उमेदवारीचा निर्णय राखून ठेवला होता. भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली यात बीडमधून गोपीनाथ मुंडे आणि नागपूरमधून नितीन गडकरी या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले आहे.

 

विशेष म्हणजे बीडमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध मुंडे अशी लढाई सर्वश्रूत्र आहे. त्यामुळे बीडमधून राष्ट्रवादी कुणाला उमेदवारी देणार याबाबत चर्चा सुरू होती. अखेर राष्ट्रवादीने सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर केलीय. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने अभिनेते नंदू माधव यांना उमेदवारी जाहीर केली. पण बीडमध्ये खरी लढत ही मुंडे विरोधात सुरेश धस अशी रंगणार एवढे निश्चित आहे. ही निवडणूक आपणच जिंकणार असा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केलाय. तर आपल्याविरूद्ध कोणी उभं राहण्यास तयार नव्हतं, अशावेळी धसना बळीचा बकरा बनवल्याची प्रतिक्रिया मुंडेंनी दिली.

 

राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

1) नाशिक – छगन भुजबळ
2) माढा – विजयसिंह मोहिते पाटील
3) बारामती – सुप्रिया सुळे
4) उस्मानाबाद- पद्मसिंह पाटील
5) अमरावती- नवनीत राणा
6) ठाणे – संजीव नाईक
7) मुंबई नॉर्थ ईस्ट – संजय दिना पाटील
8) शिरुर – देवदत्त निकम
9) बुलडाणा- कृष्णराव इंगळे
10) सातारा- उदयनराजे भोसले
11) दिंडोरी- भारती पवार
12) भंडारा- प्रफुल्ल पटेल
13) अहमदनगर- राजीव राजळे
14) परभणी- विजय भांबळे
15) कल्याण- आनंद परांजपे
16) रावेर – मनिष जैन
17) कोल्हापूर – धनंजय महाडिक
18) जळगाव – सतीश पाटील

  • Sachin Nalawade

    Best fight in Maharashtra, Mundhe Saheb cannot go out of Beed now!

close