राज-गडकरींची मुंबईत बैठक, उद्धव ठाकरे नाराज

March 3, 2014 4:57 PM0 commentsViews: 4337

raj gadkari03 मार्च : निवडणुकांची घोषणा व्हायला आता फक्त काही दिवस उरले असताना याच पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट होतेय. मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय.

महायुतीत नवा गडी घेणार नाही असं महायुतीच्या नेत्यांनी आधीच स्पष्ट केलंय. मात्र राज-गडकरींची असलेली मैत्री लक्षात घेता या बैठकीला महत्व प्राप्त झालंय. नुकतच राज आणि गडकरी यांनी नाशिकमधल्या गोदापार्कच्या भूमिपुजनाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली होती.

मात्र राज-गडकरी यांच्या भेटीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज असल्याचं कळतंय. याबाबत उद्धव ठाकरेंनी भाजपाध्यक्ष राजनाथ सिंग यांच्याकडे तक्रार केली आहे. तर दुसरीकडे नितीन गडकरी आणि राज ठाकरे काँग्रेसमुक्त भारताबद्दल चर्चा करण्यासाठी भेटले, असं स्पष्टीकरण मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिलंय.

close