यवतमाळमध्ये रेल्वे उद्यानाचं खर्गे यांच्या हस्ते भूमिपूजन

March 3, 2014 4:34 PM0 commentsViews: 141

346yavatmal rail03 मार्च : यवतमाळ शहरातील खुल्या रेल्वेच्या जागेवर राज्यातलं सर्वात मोठं रेल्वे उद्यान साकारलं जातंय. या उद्यानाचं भूमिपूजन केंद्रीय रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते करण्यात आलं.

शहरातल्या मध्यभागी रेल्वेची 22 एकर जागा आहे. या जागेवर एका उद्यानाची निर्मिती व्हावी यासाठी खासदार विजय दर्डा प्रयत्नशील होते. अखेर आज या जागेचं रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय.

यवतामाळ सारख्या दुर्गम जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळकर रेल्वेचं स्वप्न बघत आहे. आता केंद्र सरकारने पुढाकार घेतल्यामुळे जनतेचं हे स्वप्न साकार होणार आहे.

close