ठाणे पालिकेच्या इमारतीचा भाग कोसळण्याच्या मार्गावर

March 3, 2014 4:55 PM0 commentsViews: 236

Image img_210692_thanemahapalika_240x180.jpg03 मार्च : निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने ठाण्यात कल्स्टर डेव्हलपमेंट योजनेला मंजुरी दिली पण आता दुसरीकडे ठाणे महापालिकेची इमारत धोक्यात सापडली आहे. पालिकेच्या मुख्यालयातला काही भाग कोसळण्याच्या मार्गावर आहे.

सावधगिरीचा उपाय म्हणून ठाणे आपत्कालीन कक्षाने पालिकेचा परिसर मोकळा केलाय. महापौरांसह आसपासच्या लोकांना बाहेर काढण्यात आलंय. इमारतीचा धोकादायक भाग पाडण्यात येणार आहे. सर्व कर्मचार्‍यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात येत आहे.

महापौर कार्यालयातलं काम सुरू आहे. महापौर कार्यालयाजवळच्या केबिन्स बंद करण्यात आल्या आहेत. ठाणे फायर ब्रिगेड आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचं पथक घटनेच्या ठिकाणी दाखल झालंय.

close