नरेंद्र मोदी-पासवान एकाच व्यासपीठावर

March 3, 2014 4:49 PM0 commentsViews: 722

paswan and modi03 मार्च : काँग्रेसचा हात सोडून भाजपच्या गोटात दाखल झालेले लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी तब्बल दशकभरानंतर आज एका व्यासपीठावर आले.

बिहारमधल्या मुझफ्फरपूरमध्ये नरेंद्र मोदींची जाहीर सभा सुरू आहे. त्यात एनडीएत पुन्हा परतलेले पासवान यांनीही भाषण केलं. मागील आठवड्यात पासवान भाजपमध्ये दाखल झाले.

2002 मध्ये गुजरात दंगली झाल्यानंतर पासवान एनडीएतून बाहेर पडले होते. तेव्हापासून त्यांनी सतत मोदींवर टीका केली होती. पण आता निवडणुकीच्या तोंडावर पासवान यांनी बिहारमध्ये भाजपशी युती केलीय.

close