‘ऑस्कर’भरारी

March 3, 2014 6:33 PM0 commentsViews: 391

03 मार्च : 86 व्‍या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ’12 इयर्स अ-स्लेव’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा बहुमान पटकावला आहे. ’ग्रॅव्हिटी’ ‘अमेरिकन हसल’ आणि ’12 इयर्स अ स्लेव’ या तीन सिनेमांमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात चुरस दिसून आली.

’12 इयर्स अ स्लेव’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा बहुमान पटकावला असला तरीदेखील ‘ग्रॅव्हिटी’ने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर मोहोर उमटवली आहे. तब्बल सात पुरस्कार ‘ग्रॅव्हिटी’ने आपल्या नावी केले. या सिनेमाला एकुण आठ नामांकन मिळाली होती. त्यापैकी सात पुरस्कारांवर ग्रॅव्हिटीने आपले नाव कोरले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटॉग्राफी, व्हिज्युअल इफेक्ट्स, एडिटींग, साऊंड मिक्सिंग आणि सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर या पुरस्कारांवर ‘ग्रॅव्हिटी’ने आपले नाव कोरले आहे. अल्फान्सो क्युरॉन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. लॅटीन दिग्दर्शकाने पहिल्यांदाच ऑस्कर पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार केट ब्लँचेटने आपल्या नावी केला. ‘ब्लू जास्मिन’ या सिनेमासाठी केटला हा पुरस्कार मिळाला. तर ‘डल्लास बायर्स क्लब’ या सिेनेमातील भूमिकेसाठी अभिनेता मॅथ्यू मॅककोनाऊगे हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. लॉस एंजेलिसच्‍या डॉल्‍बी सभागृहात हा सोेहळा रंगला. ऑस्कर 2014ची सुरुवात सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या पुरस्काराने झाली. हा पुरस्कार अभिनेता जेरड लेटोला मिळाला. ‘डल्लास बायर्स क्लब’ या सिनेमातील भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला.
  • ऑस्कर बेस्ट फॉरिन लॅग्वेज फिल्म – द ग्रेट ब्युटी – इटली
  • ऑस्कर बेस्ट डॉक्युमेंटरी फिचर – 20 फीट फ्रॉम स्टारडम – मॉर्गन नेवील,जील फ्रीसन ,कॅटरीन रॉजर्स
  • ऑस्कर – बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट – द लेडी इन नंबर 6 , म्युझिक सेव्ह माय लाईफ – मालक्म क्लार्क आणि निकोलास रीड
  • ऑस्कर बेस्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्म – हेलियम – अँडर्स वॉल्टर्स आणि किम मॅग्नसन
  • ऑस्कर बेस्ट व्हिज्युल इफेक्ट – ग्रॅव्हिटी
  • ऑस्कर बेस्ट ऍनिमेटड फिचर फिल्म – फ्रोझन – ख्रिस बक, जेनिफर ली, पीटर डेल वेको
  • बेस्ट एनिमेटेड शॉर्ट फिल्म – मिस्टर हबलो – लॉरेन्ट विट्झ आणि अलेक्झांडर एस्पिगेरस
  • ऑस्कर बेस्ट मेकअप – ऍड्यूइथा ली आणि रॉबिन मॅथ्यूज ( डलास बायर्स क्लब)
  • फ्लॅश ऑस्कर – बेस्ट कॉस्ट्‌युम डिझायन – कॅथरिन मार्टिन – द ग्रेट गॅटस्‌बी
  • ऑस्कर पुरस्कार सोहाळा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता जेरेड लेटो – (डलास बायर्स क्लब)
  • ऑस्कर -बेस्ट साऊंड मिक्सिंग- ग्रॅव्हिटी – स्किप लेव्हिस,नीव ऍड्री,क्रिस्तोफर बेनस्टेड , क्रिस मुन्रो
  • बेस्ट साऊंड एडिटिंग – ग्रॅव्हिटी – ग्लेन फ्रिमेंण्टल
  • ऑस्कर बेस्ट ऍक्ट्रेस इन सर्पाेटिंग रोल -ल्युपिता निआँग – 12 इयर्स अ स्लेव
  • ऑस्कर – बेस्ट सिनेमॅटोग्राफर – ग्रॅव्हिटी – इमॅन्युएल लुबेज्की
  • बेस्ट प्रॉडक्शन डिझाईन – द ग्रेट गॅट्स्बी – कॅथरिन मार्टिन , बेवर्ली डन
  • बेस्ट म्युझिक ओरिजनल स्कोर – ग्रॅव्हिटी -स्टीवन प्राईस
  • बेस्ट म्युझिक ओरिजनल साँग – लेट इट गो – फ्रोझन – क्रिस्टन अँडरसन-लोपेझ,रॉबर्ट लोपेझ
  • बेस्ट ऍडप्टेड स्क्रीनप्ले – जॉन रिडले – 12 इयर्स अ स्लेव
  • बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले -स्पाईक झोन्स – हर
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अल्फोन्सो क्युरॉ – ग्रॅव्हिटी .
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – केट ब्लँचेट – ब्लू जॅस्मिन
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता- मॅथ्यू मॅकनही – डलास बायर्स क्लब
close