पवारांमुळे बारामतीची उमेदवारी मिळाली नाही -शिवतारे

March 3, 2014 8:09 PM0 commentsViews: 9187

vijay shivtare03 मार्च : शरद पवारांमुळेच आपल्याला बारामतीची उमेदवारी मिळाली नाही, असा आरोप शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी केलाय. पवार-मोदी भेटीतच बारामतीच्या जागेची तडजोड झाली. ही भेट भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींनी घडवून आणली होती, असा गौप्यस्फोट शिवतारेंनी केलाय. उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज झालेले शिवतारे यांनी आयबीएन लोकमतकडे आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देत हा आरोप केला.

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या कथित भेटीबद्दल बरंच चर्वितचर्वण झालंय. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तर शरद पवार यांचा एनडीएमध्ये प्रवेशाचा डाव आपण आणि गोपीनाथ मुंडेंनी हाणून पाडला असा दावाही केलाय. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पुरंदरचे आमदार यांनीही शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट नितीन गडकरींनी घडवून आणली आणि या भेटीतच बारामती लोकसभेच्या जागेसाठी ऍडजस्टमेंट झाली असा गौप्यस्फोट शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी केलाय.

आयबीएन लोकमतशी बोलताना विजय शिवतारे यांनी याबाबत गोपीनाथ मुंडेंशी बोलणं झालं आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे लढणार हे पक्कं होतं पण शरद पवारांनी चाल केल्यामुळेच ही सीट त्यांना मिळाली नसल्याचा घणाघाती आरोप केलाय. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या घरगुती संबंधांमुळे नाहीतर पवार आणि गडकरी यांच्यातील सेटलमेंटमुळे बारामतीची जागा मिळाली नाही असा खळबळजनक दावाही शिवतारे यांनी केलाय. महाराष्ट्राला शरद पवार नकोत आणि सुप्रिया सुळेंना महादेव जानकरांपेक्षा शिवतारे जड गेले असते असंही शिवतारे म्हणाले.

close