मध्य रेल्वेच्या स्टेशनबाहेर चोवीस तास रुग्णवाहिका

March 12, 2009 8:37 AM0 commentsViews: 3

12 मार्च मुंबईरेल्वे स्टेशनमध्ये असलेल्या गैरसोयींविरुद्ध आयबीएन लोकमतनं चालवलेल्या कॅम्पेनची दखल रेल्वे प्रशासनानं घेतली आहे. स्टेशनच्या बाहेर चोवीस तास रुग्णवाहिकाठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय. याबाबतच टेंडरही काढल्याची माहिती मध्य रेल्वेनं आयबीएन लोकमतला दिलीय. ह्या रुग्णवाहिका जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे. रुग्णवाहिका नसल्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी उशीर होता. त्यामुळेच अनेक अपघातग्रस्त प्रवाशांचा मृत्यू होतो. याची दखल घेत आयबीएन-लोकमतनं प्रवाशांच्या प्रश्नांबाबत कॅम्पेन चालवलं. त्या कॅम्पेनची रेल्वे प्रशासनानं दखल घेऊन आता भाडेतत्त्वावर मध्यरेल्वे रुग्णवाहिका घेणार आहे.

close